एस. के. पाटील यांना राज्य आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2020

एस. के. पाटील यांना राज्य आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार

                                                                 संजय केदारी पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती सामाजिक कला साहित्य संमेलन , इचलकरंजी यांच्या कड्न देण्यात येणारा राज्य आदर्श शिक्षकरत्न गौरव पुरस्कार तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सध्या श्री शिवशक्ती हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यरत असलेले सहायक शिक्षक संजय केदारी पाटील याना जाहीर झाला आहे.

         विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळेचे बंधन न  पाळता अध्यापन करत गेल्या अनेक वर्षात त्यांनी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरवले आहेत. अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारून संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे .इयत्ता आठवी व दहावी इंग्रजी विषय व स्कॉलरशिप अध्यापन देखील ते सध्या करत आहेत
          विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाबरोबरच अध्यापणासाठी दिला असेल तो वर्ग स्वखर्चाने डिजिटल केला, फॅन , लाईट, डोअर बेल , पाणी फिल्टर , स्पीच बॉक्स , व्हाईट बोर्ड, डिजिटल , साऊंन्ड सिस्टीम अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत .
         त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मोफत मार्गदर्शन व मोफत पुस्तकांचा पुरवठा देखील ते करतात.शिक्षक असूनही लॉक डाऊन नंतर दोन महिने आरोग्य केंद्राकडे ड्यूटी आनंदाने पार पाडत कोविड संदर्भात जनजागृती करत आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजसेवा जोपासली आहे .लॉक डाऊनमध्ये सामाजिक प्रबोधनाबरोबरच अनेकांना मदतीचा हात दिला .हजारो समस्या शासनाकडे वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्याचा पाठपुरावा केला आहे.
          या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे . इचलकरंजी येथील महेश क्लब हॉलमध्ये २५ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध जेष्ठ टिव्ही कलाकार , अभिनेते , दिग्दर्शक व मिर्माता अरुण नलावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती निवड समितीची अध्यक्षा सौ अबोली मुल्ला यानी दिली आहे . संजय केदारी पाटील याना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .सद्या ते स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष असून चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य आहेत.


No comments:

Post a Comment