होलसेल धान्य व्यापारी काशिनाथ हिडदुगी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2020

होलसेल धान्य व्यापारी काशिनाथ हिडदुगी यांचे निधन

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

मूळचे नेसरी (ता. गडहिंग्लज) व सध्या राहणार  बेळगाव, शहापूर, जोशी मळा येथील काशिनाथ शिवपुत्रापा  हिडदुगी (वय 60) यांचे मंगळवार दि. 22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे. ते होलसेल धान्य व्यापारी होते. बेळगाव येथील धान्य व्यापारी सर्वेश हिडदुगी व साहिल हिडदुगी यांचे ते वडील तर कोल्हापूर येथील उद्योजक सुभाष हिडदुगी यांचे ते कनिष्ठ बंधू होत.No comments:

Post a Comment