म्हाळेवाडी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2020

म्हाळेवाडी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यूचंदगड/प्रतिनिधी

म्हाळेवाडी ता.चंदगड येथे विहिरीतील पाण्यात बुडून विष्णू रुकमाना दळवी  (वय ५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

   दळवी हे ऊस व केळी बागेला पाणी देतो असे सांगून माणीचे काठे नावाच्या शेताकडे गेले होते. रात्री घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या शेतातील विहिरीत आढळला. इंजिन चालू करताना त्यांचा तोल गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. या घटनेची वर्दी लिंगापा दळवी यांनी पोलिसात दिली आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार हणमंत नाईक करत आहेत.No comments:

Post a Comment