धनगर समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - प्रवीण काकडे - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2020

धनगर समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - प्रवीण काकडे

                       कलिवडे (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावर अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास                         ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करताना प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, प्रा पूजारी,कात्रट आदी

चंदगड / प्रतिनिधी

           शिवरायांच्या काळापासून ते आजतागायत धनगर समाज डोंगर दऱ्या खोर्‍यात राहत असुन आजही विकासापासून वंचित राहिला. हजारो वन्य प्राण्यांच्या हल्ले होत असून कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने या समाजाला विविध सुविधे पासुन वंचित रहावे लागत आहे. तसेच रस्ते, वीज, आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने धनगर समाजाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी व समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. 

       कोरोना महामारी संकटामुळे डोंगर दऱ्या-खोर्‍यातील विद्यार्थ्यांना  ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मुलानं मोबाईल घेणे शक्य नसल्याने त्यांना कायम स्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी केले. ते चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व जंगलात राहणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांचे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहर बाजारी होते. 

           अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीने गेल्या ९ महिन्यापासून पासुन सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत १६४४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व ३० विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. चंदगड तालुक्यातील एकूण १३धनगर वाडे असून त्यापैकी ४ धनगर वाड्यातील एकून ११० मुलांना शैक्षणिक मदत केली. काजिर्णे, कानुर, कलिवडे व जंगमहटटी धनगरवाडा येथे मदत केली आहे याप्रसंगी  ल इंडिया धनगर महासंघ, प्रा. शंकरराव पुजारी जिल्हा अध्यक्ष ल इंडिया धनगर महासंघ, संजय कात्रट कोल्हापुर शहर अध्यक्ष ल इंडिया, देऊ यमकर चंदगड तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष विठ्ठल शेळके, जगन्नाथ यमकर, रघुनाथ जानकर, लक्ष्मण शेळके, धोडीबा येडगे, पृथ्वीराज बेडर व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment