संजय पाटील यांना राज्य आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2020

संजय पाटील यांना राज्य आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार

                                                         संजय पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती सामाजिक कला साहित्य संमेलन, इचलकरंजी यांच्याकडून देण्यात येणारा राज्य आदर्श पत्रकार दर्पणरत्न  गौरव पुरस्कार कोवाड (ता. चंदगड) येथील सी. एल. न्युज व दै. महासत्ताचे पत्रकार संजय मष्णू पाटील यांना जाहिर झाला आहे.

     चंदगड तालुक्यात सलग दोन वर्षे आलेल्या महापुरात व कोरोना काळात उत्कृष्ठ व्हिडीओ वृत्त तसेच मदतकार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे. इचलकरंजी येथील महेश क्लब हॉलमध्ये २५ डिसेंबर 2020 रोजी सुप्रसिद्ध जेष्ठ टिव्ही कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता अरुण नलावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याची माहिती निवड समितीची अध्यक्षा सौ. अबोली मुल्ला यांनी दिली आहे. संजय पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment