ठेकेदाराकडे खंडणीची मागणी व धमकी, पोलीसांत गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2020

ठेकेदाराकडे खंडणीची मागणी व धमकी, पोलीसांत गुन्हा दाखल

         

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील अनिल जोतिबा तळगुळकर  या इसमाने रोड कांट्रक्टर  बसवंत लक्ष्मण अडकूरकर यांच्या कडे  पाच लाख रुपये खंडणीची मागणी न दिल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
       पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते मोटनवाडी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असताना अनिल तळगुळकर याने ठेकेदार बसवंत अडकूरकर यांना "माझ्या टक्क्याचे काय झाले? तुम्हाला किती वेळा सांगायचे, असे म्हटले व अर्वाच्च शिवीगाळ करत माज आलाय का असे म्हणत पैसे नाही दीले तर तालुक्यात रस्त्याची कामे व्यवस्थित केली जात नाहीत म्हणून आंदोलन करतो अशी धमकी दिली तर दुस-या दिवशी तुम्ही मला पुन्हा एकदा पाटणे फाटा येथे पाच वाजण्याच्या सुमारास माणगाव कडे जाणा-या रस्त्यालगत हाँटेल  कलावती समोर भेटून तुम्ही मला थांबवू नका,थांबवायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील असे म्हटले तर या पूर्वी एकदा ७डिसेंबर  रोजी दुपारी २वाजता तीन-चार साथीदार सह पाटणे फाटा ते मोटनवाडी दरम्यान रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरू असताना येवून काम बंद पाडले, यावेळी काम दर्जेदार केले जात असल्याचे जमलेल्या लोकांना पटवून दिले असता लोक निघून गेली.आता हे आंदोलन चे नाटक संपले आहे,पाच लाख रुपये द्यावे नाही तर जिवंत सोडणार नाही,तू काम कसे करतोस ते बघतो अशी धमकी दिली असल्याची फिर्याद अडकूरकर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे, पोलीसांनी ३८५,३८७,५०४,५०६,३४ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पो.स.ई.दिलीप पवार करत आहेत.




No comments:

Post a Comment