रवळनाथ गृहतारण संस्थेकडून संजय पाटील यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2020

रवळनाथ गृहतारण संस्थेकडून संजय पाटील यांचा सत्कार

                    संजय पाटील यांचा सत्कार करताना शाखा चेअरमन आर. डी. पाटील, प्रा. डी.एम. पाटील.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       श्री रवळनाथ गृहतारण संस्था मर्यादीत आजरा शाखा नेसरी (ता. गडहिंग्लज) यांच्याकडून राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती इचलकरंजी यांचा श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूरचे अध्यापक संजय पाटील याना राज्य गुणवंत शिक्षकरत्न  गौरव पुरस्कार मिळाल्या बद्द्ल सत्कार करण्यात आला.
       नेसरी शाखेचे चेअरमन आर. डी. पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या गुणवंत सभासदांचा गौरव करून त्याना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सदैव कटीबद्ध आहे. गुणवंत सभासदामुळे संस्थेच्या वैभवात भर पडत असल्याचे विचार शाखा चेअरमन आर. बी. पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी शाखाधिकारी किरण कोडोली, अकौंटंट, बाळकृष्ण गवळी, कलार्क रोहन लोखंडे, सुशांत धुमाळे, राजेश बल्लाळ, मंगेश देसाई आदिजन उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्रा. डी. एम. पाटील यांनी केले. तर आभार किरण कोडोली यांनी मानले.

No comments:

Post a Comment