पाटणे येथे सुवर्णपदक प्राप्त प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

पाटणे येथे सुवर्णपदक प्राप्त प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचा सत्कार

पाटणे : दत्ता पाटील यांचा सत्कार करताना एम. आर. सनदी. शेजारी एन. एम. धामणकर, डी. आर. भांडकोळी यांच्यासह अन्य मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

     पाटणे (ता. चंदगड) रेंजचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल वनखात्याकडून सुवर्णपदक जाहीर झाले. याबद्दल पाटणे रेंज कार्यालयातर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.

        मूळचे घाटकरवाडी (ता. आजरा) येथील सुपुत्र दत्ता पाटील हे गेल्या दीड वर्षांपासून पाटणे रेंज चे प्रभारी वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात शिकारी रोखण्यासह जंगल तोडीवर निर्बंध यासारखी कामे करून कर्नाटकातून आलेल्या हत्तींना नावे देऊन त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना वने व वन्यजीव व्यवस्थापन समिती अंतर्गत सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वनमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

           यावेळी तुडयेचे वनपाल एन. एम. धामणकर, कळसगादेचे वनपाल डी. आर. भांडकोळी, वनरक्षक एम. आर. सनदी (वनरक्षक कोलिक), सदाशिव तांबेकर (वनरक्षक कोलिक - १), सुनीता गावडे (वनरक्षक हाजगोळी), एस. एस. बोंद्रे (वनरक्षक म्हाळुंगे), एस. एस. जितकर (वनरक्षक कारवे), नंदकुमार पाटील (वनसेवक), एस. के. शिंदे (वनसेवक), कार्वे वन नाका तपासनीस मेघराज हुल्ले, दीपक कदम, डाटा ऑपरेटर पास्कल डिसोजा यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment