शिक्षण विस्तार अधिकारी एम .टी कांबळे यानी साधला विद्यार्थ्यांशी संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2020

शिक्षण विस्तार अधिकारी एम .टी कांबळे यानी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

शिक्षण विस्तार अधिकारी एम .टी. कांबळे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा 

         चंदगड तालूक्यातील माध्यमिक शाळांना शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे भेट देवून कोरोना संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.

         कोविडच्या प्रादुर्भावानंतर बंद झालेल्या माध्यमिक शाळा हळूहळू चालु होत आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा चालू होत असल्या तरी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये अजूनही भितीचे वातावरण आहे. शिक्षण विस्तार अधिकारी श्री कांबळे यानी बागीलगे-डुक्करवाडी विद्यालय, तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी शाळांना भेटी देवून कोविड नियमांचे पालन होते का? यांची तपासणी केली. तसेच वर्गातील बैठक व्यवस्था, मास्क व सॅनिटाझरचा वापर होतो की नाही पाहिले. तसेच कोविडचा धोका सांगून आगामी काळात तालूक्यात होत असणाऱ्या यात्रा, सार्वजनिक समारंभ पूर्णतः टाळण्याचे विद्यार्थ्याना आवाहन केले. यावेळी माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment