जगप्रसिद्ध रांगोळी कलाकार सौ. राजश्री भागवत यांनी सुळये गावात साकारल्या रांगोळ्या - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2020

जगप्रसिद्ध रांगोळी कलाकार सौ. राजश्री भागवत यांनी सुळये गावात साकारल्या रांगोळ्या


जगप्रसिद्ध रोगोळी कलाकार सौ राजश्री भागवत यानी सुळये येथे साकारलेली रांगोळी त्यांनी घातलेल्या रांगोळीचे एक दर्शन.

तेऊरवाडी (संजय पाटील)

         जगप्रसिद्ध रांगोळी कलाकार सौ. राजश्री नितीन भागवत जुन्नरकर या दोन दिवसापूर्वी चंदगड तालुक्यातील सुळये गावात असलेल्या एका वैवाहिक सोहळ्यात उपस्थित राहून आपल्या रांगोळी कलेने अनेकांचे डोळे दिपवून टाकले. येथे अतिशय सुंदर अशा रांगोळ्या टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला .

           राजश्री भागवत जुन्नरकर यांच्या वरती अनेक रेकॉर्डची नोंद आहे. आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या वारीच्या संपूर्ण मार्गावर 300 कि.मी. गेले आठ वर्षे रांगोळीच्या पायघड्या ची विनामूल्य सेवा सुरू आहे.सुरत या ठिकाणी 11 किलोमीटर नॉनस्टॉप पाच तासांमध्ये रांगोळी घालून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी नोंद केली आहे. रांगोळीच्या माध्यमातून पूर्ण भारतभ्रमण केले आहे विविध ठिकाणावरून रांगोळी साठी त्यांना आमंत्रित केले जाते. परदेशातून सुद्धा रांगोळीसाठी आमंत्रण मिळाले आहेत. त्याचबरोबर या कार्यासाठी त्यांना समाजभुषण, पिंपरी-चिंचवड भूषण, भोसरी भूषण एक सामाजिक ध्यास रत्न पुरस्कार त्याच प्रमाणे अनेक महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सामाजिक धार्मिक संस्थान मार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.सुळये येथील प्रदीप रमेश गावडे यांच्या बहिणीच्या मंगलमय सोहळ्याला त्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून या मंगलमय सोहळ्यात दोन दिवस चंदगड रवळनाथ मंदिर देवालय च्या हॉलमध्ये रांगोळी व सुळये येथील अंगणवाडी हॉलमध्ये व गावातील ठिकठिकाणी रांगोळी घालून आपल्या कलेचे दालन  भरवले होते. त्यांनी घातलेली रांगोळी पाहून सर्वजण अवाक झाले. नेहमी पंढरपूरच्या विठोबारायाच्या पुण्यभूमीवर रांगोळी घालण्याचा मान राजश्री नितीन भागवत जुन्नरकर यांना असल्याने तालुक्यातील संत मंडळीने त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. पायी दिंडी ने विठुरायाचे दर्शन घेणाऱ्या अनेक दिंड्या या लग्नसमारंभात सहभागी होत्या. राजश्री भागवत यां चंदगड नगरीत उपस्थित असल्याने सुळये ग्रामस्थांच्यावतीने विवाह प्रसंगी त्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment