लोकमान्य पतसंस्थेच्या कोवाड शाखेचा सोमवारी वर्धापन दिन - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2020

लोकमान्य पतसंस्थेच्या कोवाड शाखेचा सोमवारी वर्धापन दिन

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह  पतसंस्थेच्या निट्टूर रोड कोवाड शाखेचा ९ वा वर्धापन दिन उद्या सोमवार दि. २१ रोजी संपन्न होणार आहे. अध्यक्ष किरण ठाकुर, संचालक गजानन धामणेकर, विरसिंह भोसले, कोल्हापूर विभाग क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत १० वाजता महापुजा होणार आहे. त्यानंतर सायं. ५  पर्यंत सर्व हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाखाधिकारी गोविंद दंडगे यांनी शाखेच्या वतीने केले आहे.No comments:

Post a Comment