कामगार व कामगार कुटुंबासाठी आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2020

कामगार व कामगार कुटुंबासाठी आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       कामगाराचे श्रम जितके मोलाचे आहेत, तितकेच त्याची सुरक्षा घेणे हे देखील महत्त्वाचे आहे. कामगार हा देशाच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. कामाच्या ठिकाणी घेतली जाणारी सुरक्षा ही कामगारांचे जीवनमान उंचावणारी असते. यासाठी डि. के. शिंदे स्कुल फ सोशल वर्क (सायबर) यांच्या मार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी जागृकता निर्माण करणारी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

        या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हातील औद्योगिक क्षेत्रात येणारा कोणत्याही तालुक्यातील कामगार व त्याचा कुटुंब सदस्य सहभागी होवू शकतो. कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यासाठी व धुम्रपान आदी गोष्टी पासून रोखण्यासाठी या महाविद्यालया मार्फत वेळोवेळी नवनवे उपक्रम होत असतात. यासाठी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. शिरोळ, समन्वयक डॉ. डि. एन. वळवी, डॉबी. एन. पाटील, डॉके. प्रदिपकुमार यांचा मोलाचा वाटा आहे.

   कामगारांच्या अनुषंगाने बदलाची जाणीव करून देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8530849956 व 9823645959 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन स्टुंड्स एच आर फोरम यांच्या मार्फत करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment