शांताबाई पवार यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी होसूर येथे रक्तदान शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2020

शांताबाई पवार यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी होसूर येथे रक्तदान शिबिर

                                                                         
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      होसूर (ता. चंदगड) येथे स्वर्गीय शांताबाई रामचंद्र पवार यांच्या स्मरणार्थ शुक्रवार दि. ११  रोजी येथे रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती पुंडलिक पवार (सहाय्यक शिक्षक, महाराष्ट्र हायस्कूल, ता. गडहिंग्लज) व सुबराव पवार (लेखापाल, आरोग्य विभाग, जि. प. कोल्हापूर) यांनी दिली. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होईल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पमाला मोहनराव जाधव असतील.

शांताबाई पवार

      बेळगाव येथील महावीर ब्लड बँक व जिल्हा परिषद कोल्हापूर (आरोग्य विभाग) व जागर फाउंडेशन (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिर ख्रिश्चन चर्च समोर सकाळी ८.३० वाजता होणार आहे. अध्यात्मिक मार्गदर्शिकाचे विमोचन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे (कोल्हापूर जिल्हा परिषद) यांच्या हस्ते प्रतिमापूजन होईल. जागर फाउंडेशन, कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांच्या हस्ते होईल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद अ. पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक विनोद पाटील, नेसरी येथील उद्योजक किरण गंगली, नवोदित उद्योजक संदीप रमेश शहापूरकर (कोल्हापूर) यांचा फादर सुशांत मंत्री व एस. एल. पाटील यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रविराज उर्फ रामचंद्र पवार  यांनी केले आहे.No comments:

Post a Comment