श्वेता कुंभार हिच्या जाण्याने कोवाडकर हळहळले - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2020

श्वेता कुंभार हिच्या जाण्याने कोवाडकर हळहळले

                                      श्वेता आनंद कुंभार

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड (ता. चंदगड) कुंभार गल्ली येथील श्वेता आनंद कुंभार (वय 18) हीचे पुणे येथे उपचार सुरू असताना  आजाराने बुधवारी पहाटे निधन झाले. बोलक्या स्वभावाची, सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारी, नाटकांमध्ये विविध भूमिका सादर करणारी, नवोदित कवयित्री श्वेता अचानकपणे निघून गेल्याने सारे कोवाडकर हळहळले.

           तिने आपले आजोबा  कै. पांडुरंग कुंभार यांच्या पावलावर पाऊल ठेवत साहित्यक्षेत्राची स्वतःला आवड निर्माण केली होती. तिच्या अनेक कविता विविध  दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या आहेत. श्रीराम विद्यालय (कोवाड) मधून ती नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. तिच्या पश्चात भाऊ, आई, वडील, दोन काका, असा परिवार आहे. कोवाड येथील व्यापारी आनंद कुंभार यांची ती कन्या तर मलतवाडी येथील प्राथमिक शिक्षक विनायक कुंभार व भुदरगड पंचायत समितीचे लेखनिक संजय कुंभार यांची ती पुतणी होती. तिच्या जाण्याने कुंभार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.No comments:

Post a Comment