जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतीमध्ये सन 2020 ते 2025 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, 15 डिसेंबर 2020 रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
आरक्षण निश्चित करतेवेळी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये केलेल्या सुधारणानुसार तसेच शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक अधिनियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदीनुसार निश्चित केले आहेत. या निवडणूक नियमातील 2 अ मधील पोटनियम (4) व (6) मधील तरतुदीनुसार सरपंचाची पदे आरक्षित करावायची आहेत. तहसिलदार यांनी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करून सरपंच पदे प्रवर्गनिहाय आळीपाळीने नेमून द्यावीत.
शाहूवाडी- पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, शाहूवाडी, पन्हाळा- पन्हाळा नगरपरिषद हॉल, मयुर बाग, एसटी स्टँण्डच्या मागे पन्हाळा, हातकणंगले- नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय हातकणंगले, शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय शिरोळ, करवीर- बहुद्देशीय हॉल, रमनमळा कसबा बावडा, कोल्हापूर, गगनबावडा- तहसिल कार्यालय गगनबावडा, नवीन प्रशासकीय इमारत, राधानगरी- राजर्षी शाहू सभागृह, तहसिल कार्यालय राधानगरी, कागल- बहुद्देशीय सभागृह, तहसिलदार कार्यालयजवळ, कागल, भुदरगड- पंचायत समिती भुदरगड येथील दिनकरराव जाधव सभागृह (गारगोटी) दुसरा मजला, आजरा- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय आजरा, गडहिंग्लज- शाहू सभागृह, नगरपरिषद गडहिंग्लज, चंदगड- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय चंदगङ
तालुकानिहाय निश्चित केलेल्या (बिगर अनुसूचित क्षेत्र) मधील ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने वरील नमूद ठिकाणी काढणेकामी तसेच स्त्री आरक्षण निश्चित करणेकामी संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांना जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात येवून आरक्षण सोडत काढणेकामी मंगळवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा निश्चित करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या अरक्षण बाबतची जाहीर सूचना तालुक्यातील सर्व गावी जाहिर दवंडीने देऊन तसेच ग्रामपंचायतीच्या फलकावर किमान 3 दिवस जनतेच्या माहितीसाठी राहील याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत स्थानिक वृत्तपत्रात सोडतीबाबत आगाऊ प्रसिध्दी व्यापक पध्दतीने देण्यात यावी त्यासाठी तालुक्यांतील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य तसेच आपल्या तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना देखील सोडतीचे वेळी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रीत करण्यात यावे.
No comments:
Post a Comment