चंदगड तालुक्यात बंदला प्रतिसाद, वाचा कोठे झाले आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

चंदगड तालुक्यात बंदला प्रतिसाद, वाचा कोठे झाले आंदोलन

                          शेतकरी कायद्याविरोधात पाटणे फाटा (ता. चंदगड) आंदोलन करताना आंदोलक

चंदगड / प्रतिनिधी

       शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी पाटणे फाटा येथे काँग्रेस आणि स्वाभिमानी,बळीराजा  शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत भारत सरकाने पारित केलेल्या कायद्याना विरोध  करून विधेयकाची होळी करण्यात आली. तसेच काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करून आजच्या भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला. 

     

यावेळी राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुका अध्यक्ष संभाजी देसाई (शिरोलीकर) म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून सरकारने सरकारने पारित केलेले कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करावे.


                यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही कोवाड व पाटणे फाटा येथे निषेध निदर्शने करण्यात आली. सरकाने उद्योगपतींच्या बाजूचा शेतकरी विरोधी कायदा बनवला आहे. या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच सरकार एकूण घेत नाही. तरी आपला त्या शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, आम्ही या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सांगितले.बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, विक्रम चव्हाण-पाटील , 
 महादेव वांद्रे साहेब , नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, अभिजित गुरबे, करीम मदार, पांडुरंग बेनके,जयवंत शिंदे, आर. के. पाटील, तुकाराम पाटील, उदय देसाई, चंद्रकांत कागनकर, चंद्रकांत बागडी, मनोहर कुट्रे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.


  

No comments:

Post a Comment