चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी आजपासून अर्ज भरण्याला प्रारंभ, वाचा कसा आहे निवडणुक कार्यक्रम? - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2020

चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी आजपासून अर्ज भरण्याला प्रारंभ, वाचा कसा आहे निवडणुक कार्यक्रम?

                        

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी पासून उमदेवारांना अर्ज भरता येणार आहे.

        २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज भरणा, ३१ डिसेंबरला छानणी, ४ जानेवारी २०२१ दुपारी तीन पर्यंत माघार व तीन नंतर चिन्ह वाटप, १५ जानेवारीला ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ४१ ग्रामपंचायतीमध्ये ३० हजार ४३५ पुरुष तर २९ हजार ७४८ महिला असे ६० हजार १८३ मतदार मतदानाची हक्क बजावणार आहेत.

            निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायती

जांबरे, बुक्कीहाळ, देवरवाडी, ढोलगरवाडी, धुमडेवाडी, किटवाड, कौलगे, माडवळे, म्हाळेवाडी, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, कालकुंद्री, कोवाड, राजगोळी बुद्रुक, मांडेदुर्ग, आसगाव, बसर्गे, बागिलगे, बोजुर्डी, दाटे, दिंडलकोप, घुल्लेवाडी, हाजगोळी, हलकर्णी, होसूर, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, केरवडे, किणी, मलतवाडी, मुगळी, नागवे, नांदवडे, पुंद्रा, सुरुते, शिनोळी खुर्द, तुडये व चिंचणे.No comments:

Post a Comment