चंदगड मतदार संघातील १३ बंधाऱ्यांची दुरूस्ती लवकरच - पाटबंधारे शाखाधिकारी तुषार पवार - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2020

चंदगड मतदार संघातील १३ बंधाऱ्यांची दुरूस्ती लवकरच - पाटबंधारे शाखाधिकारी तुषार पवार

 


तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

   चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालूक्यातील जवळपास १३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून यासाठी ४ .५० कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती तुर्केवाडी पाटबंधारे चे शाखाधिकारी तुषार पवार यानी सी .एल. न्यूजशी बोलताना दिली .
    चंदगड मतदार संघाचेआमदार राजेश नरसिंगराव पाटील  यानी लॉकडाऊन व कोरोणाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच १३ बंधाऱ्यांच्या दुरूस्ती संदर्भातीत  पत्रव्यवहार शासनाकडे व नामदार जयंत पाटील यांचेकडे केला होता . यानंतर या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे . निवडणूकांच्या आचारसंहिता असल्याने ही कामे करताना तांत्रीक अडचणी येत आहेत. कोवाड बंधाऱ्यासाठी निधी मंजूर होण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवले आहेत .आचारसंहिंता संपल्यानंतर जानेवारी मध्ये  या बंधाऱ्याच्या कामाला सुरवात केली जाईल . दगडी पिलर काढून क्राँक्रीटचे पिलर बांधण्यात येणार आहेत . कर्टन वॉल बरोबर वरती रेलिंगही करण्यात येणार आहे .तालूक्यातील धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे . त्यामूळे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही . सध्या अडकूर जवळील गणूची वाडी बंधारा दुरुस्तीचे काम चालू आहे . याबरोबरच ताम्रपर्णी 
 नदिवरील  माणगाव कोवाड , हल्लारवाडी , कोकरे ,
कामेवाडी घटप्रभा नदिवरील गणूचीवाडी , बिजूर , भोगोली , तारेवाडी आदि हिरण्यकेशी 
नदिवर असणाऱ्या खणदाळ ,गिजवणे , चांदेवाडी , हाजगोळी आदि बंधारे दुरुस्त करण्यात येणार असून यासाठी आमदार राजेश पाटील  स्वतः या कामाकडे लक्ष देत आहेत . तसेच या बंधाऱ्यांच्या ठिकाणी असलेल्या चौक्या मोडकळीस आल्या आहेत . त्यांचीही दुरूस्ती करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे शाखाधिकारी तुषार  पवार यानी दिली .No comments:

Post a Comment