किणी गावाला सहा महिन्यानंतर मिळाला वायरमन - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

किणी गावाला सहा महिन्यानंतर मिळाला वायरमन


                 किणी येथे हजर झालेले नुतन वायरमन अभिजीत कांबळे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          किणी (ता,चंदगड) येथे गेल्या सहा महिन्यांपासून  वायरमन नव्हता त्यामुळे गावाला फार मोठ्या समस्या निर्माण होत होत्या म्हणून संजय कुट्रे यांच्या नेतृत्वात गावातील गैरसोई ,वीजबिल माफी व नवीन वायरमन इत्यादी समस्या संदर्भात कोवाड विद्युत महामंडळ कार्यालयावर 24 नोव्हेंबरला गावकऱ्या समवेत मोर्चा काढून निवेदन दिले होते.

        उपअभियंता विशाल लोदी यांनी गावकऱ्यांच्या मागण्या समजून घेऊन टप्याटप्याने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते.दि,4 डिसेंबर रोजी नवीन वायरमन नियुक्त केल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.कामावर हजर झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब खवरे यांच्या हस्ते वायरमन अभिजित कांबळे यांचा सत्कार झाला.यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मारुती हनुरकर,संजय कुट्रे,नरसु मोटुरे,पोलीस पाटील रणजित गणाचारी,शिवाजी बिर्जे,कल्लापा कुंभार उपस्थित होते.No comments:

Post a Comment