महागाव येथील संत गजाननमध्थे प्रवेश प्रक्रिया सूरू, विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

महागाव येथील संत गजाननमध्थे प्रवेश प्रक्रिया सूरू, विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

                               महागाव येथील संत गजानन शिक्षण समुहाचा कॅम्पस्.

चंदगड / प्रतिनिधी

        महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात शैक्षणिक वर्षे 2020-21 साठीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी इंजिनिअरिंग, बी. फार्मसी, पॉलिटेक्निक, डी. फार्मसी व इतर वैद्यकीय विद्याशाखेत प्रवेशासाठी विद्यार्थाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  मुदतीच्या आत सर्व विद्यार्थाना प्रवेश मिळावा यासाठी संस्थेच्यावतीने आजरा, उत्तूर, मुदाळतिट्टा, निपाणी, सावंतवाडी याठिकाणी प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राकडून विद्यार्थी व पालकांना उपलब्ध शासकीय सोई सवलती, शिष्यवृत्ती, प्लेसमेंट, शैक्षणिक कर्ज योजना, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, राहणेची व जेवणाची सोय याबरोबरच इतर सुविधा याची माहिती तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक विद्यार्थानी मुदतीच्या आत महागाव येथील प्रधान कार्यालय व संबंधित महाविद्यालयात नाव नोंदणी तसेच कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण,  सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण यांनी केला आहे.

        सध्या या समुहातील महागाव व हसुरवाडी या दोन कँपस मधून 13 विद्याशाखेद्वारे चार हजारहून आधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच 600 हून अधिक शिक्षक, डॉक्टर्स व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून ज्ञानदानाचे कार्य होत आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य विद्यार्थाना मिळणारे प्लेसमेंट या कार्याची दखल घेत राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय अनेक पुरस्काराने या शिक्षण समुहाला गौरवण्यात आला आहे.



No comments:

Post a Comment