ताम्रपर्णी नदीतील मृत माशांचा तात्काळ पंचनामा करण्याची शेतकरी संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

ताम्रपर्णी नदीतील मृत माशांचा तात्काळ पंचनामा करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

                         ताम्रपणीं नदीमध्ये मृत झालेले मासे. 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

      ताम्रपर्णी नदीमध्ये रविवार दि. १३ डिसेंबर २०२० रोजी कारखान्यांची मळी ताम्रपर्णी नदीमध्ये मिसळल्याने जलचर प्राणी मृतझाले आहेत. यामुळे हलकर्णी पासून कोवाड पर्यंतचे पाणी  प्रदूषीत झाले आहे. या परिसरात नदी किनारी असणाऱ्या जॅकवेलमुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात चंदगडच्या तहसिलदारांनी तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यानी केली आहे. याबाबत तहसिलदारांनी खालील बाबीची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे.

१ घटनेचा पंचनामा तात्काळ करावा. 

२ दोषी कारखान्यावर कारवाई करावी. 

३ परीसरातील जॅकवेल असणाऱ्या गावाना सतर्कतेचा ईशारा द्यावा.

४ आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याबाबत सूचना कराव्यात.

५ मृत मासे खाणाऱ्या लोकांना सावध करावे .

६ प्रदूषण महामंडळाला याबाबत  कल्पना द्यावी.

याबाबत दोषीवर त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment