
कोवाडमध्ये पाऊस पडल्याने व्यापारी वर्गाची तारांबळ झाली.
कोवाड - सी. एल. वृत्तसेवा
ढगांच्या गडगटासह सायंकाळी आलेल्या वळीव पावसाने कोवाड परिसराला झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गाची तसेच आठवडा बाजार असलेल्या कोवाड मधील व्यापारी वर्गाची पळापळ झाली.
गेले दोन दिवस चंदगड तालुक्यात ढगाळ वातावरण होते. आज सायंकाळी चारच्या सुमारास ढगांच्या गडगटासह कोवाड, कुदनुर ,माणगाव आदी परिसरात वळीव पाऊस पडला. सध्या चंदगड तालूक्यात ऊस ताडणी चालू असल्याने या ऊसतोडणीस अडथळा निर्माण झाला. तर तेऊरवाडी, निटटूर, मलतवाडी आदि गावामध्ये शेतकऱ्यांनी वैरण कापली होती. या शेतकरी वर्गाची मोठी पळापळ झाली.
No comments:
Post a Comment