कोवाड बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी, वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार कधी? - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2020

कोवाड बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी, वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार कधी?

                                 कोवाड (ता. चंदगड) बाजारपेठेत होत असलेली वाहतुकीची कोंडी

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठ ही आजूबाजूच्या 20 ते 25 गावासाठीची प्रमुख बाजारपेठ आहे.याठिकाणी नागरिकांना त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू  मिळत असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक खरेदीसाठी कोवाड बाजारपेठेला प्रथम पसंती देतात. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची कायमच गर्दी असते तर बेळगाव-आजरा,गडहिंग्लज,चंदगड ला जाणाऱ्या बसेस चे मार्ग हे कोवाड येथूनच जातात. त्यात तालुक्यातील साखर करखान्यांकडे जाणाऱ्या ऊसाची वाहतूक, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खासगी दुचाकी, चारचाकी गाड्या, ह्या रस्त्याच्या दुतर्फा  पार्किंग केल्यामुळे आणि बाजारपेठेत रस्त्यावर दोन्ही बाजूला मांडलेल्या लहान मोठया दुकानामुळे बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न हा दिवसागणिक गंभीर होत चालला आहे.

         गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी तर बाजारपेठेतून धड चालत जाणे देखील मुश्किल होत आहे.काही वेळा तर बाजरपेठेत गाड्या तासन तास एकाच ठिकाणी अडकून रहात आहेत. त्यामुळे याठिकाणी आलेल्या व्यापारी वर्ग व ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी या वाहतुकीला शिस्त लागणार कधी हा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे.

          नवीन पूल तर जणू पार्किंगसाठीच बांधण्यात आला आहे असेच येथे आल्यावर वाटते.इतकी वाहने ही नवीन पुलावर उभी केलेली असतात.मध्यंतरीच्या कालावधीत पोलिसांकडून पुलावर पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करण्यात आली. पण कारवाईची धास्ती फार थोड्या कालावधी पूर तीच राहिली आहे.

याठिकाणच्या वाहतुकीचा प्रश सुटण्यासाठी सर्व नागरिक, वाहनधारक, रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यापारी वर्गाने  शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.

1 comment:

Unknown said...

पुलावर पार्किंग करा पण फुकट वापरायला देऊ नका.भाडे वसूल करा.

Post a Comment