रवी पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित, वाचा कशाबद्दल केला सन्मान? - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2020

रवी पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित, वाचा कशाबद्दल केला सन्मान?

प्रा. किसनराव कुराडे व डॉ. एम. बी. शेख यांच्याकडून पुरस्कार स्विकारताना रवी पाटील व रोहिणी पाटील.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     कोल्हापूर येथील आविष्कार सामाजिक व  शैक्षणिक फौंडेशनतर्फे गुणवंत शिक्षक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे  नुकताच  संपन्न झाला. यावेळी तालुका चंदगड राजर्षि शाहू (माध्य.)विद्यालय शिनोळी बुद्रुक शाळेचे सहाय्यक शिक्षक रवी पाटील यांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट गुणवंत शिक्षक  पुरस्काराने गौरविण्यात आले.
                                          रवी पाटील

      यावेळी ज्येष्ठ साहत्यिक आणि विचारवंत सितायानकार प्रा . किसनराव कुराडे व उद्योगपती डॉ. एम. बी. शेख (कौन्सिल मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा), अविष्कार फौंडेशन अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार 'विद्याभवन'शिवाजी पार्क   कोल्हापूर येथे हा प्रदान करणेत आला.   
  तंत्रस्नेही रवी पाटील यांच्या डिजिटल व मोबाईल व्दारे तसेच नाविण्यपूर्ण शिक्षणातील अध्ययन अध्यापनात केलेले कार्य  राज्य व राष्ट्रीय पातळी वरील कामाची दखल घेऊन हा गौरव पुरस्कार देण्यात आला.  
       मुळचे बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावचे असून त्यांना शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार असून ते बेळगाव सीमाप्रश्नावरील अनेक कविता लेखन करून सीमाकवी म्हणून गौरविण्यात आले आहे. सध्या ते सीमाभागात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष म्हणून मराठी भाषा संवर्धनासाठी बेळगाव येथे साहित्य संमेलन भरवत असतात. 
      ते एक उत्तम वक्ते, कवी, निवेदक असून पत्रकार व साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात छाप आहे. त्यांना बेळगाव येथील जिल्हा आदर्श शिक्षक रणजित चौगुले याचे मार्गदर्शन असुन ते चंदगड तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे. मुख्याध्यापक बी.डी.तुडयेकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे. यामुळे रवी पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment