चंदगड - ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी किती ग्रामपंचायतीसाठी किती अर्ज दाखल? वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2020

चंदगड - ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी किती ग्रामपंचायतीसाठी किती अर्ज दाखल? वाचा सविस्तर

चंदगड - ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी १६ व्यक्तीचे १७ अर्ज दाखल

                                  

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतीपैकी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरात १७ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता अशी माहीती तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.

     अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायती – दाटे १, तुडये १, कोवाड ९, दिंडलकोप ३, हाजगोळी १, शिनोळी खुर्द १, चिंचणे १ अशा सात ग्रामपंचायतीच्या १६ उमेदवारांनी आज दिवसभरात १७ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरीत ३४ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी अद्याप एकही अर्ज दाखल केला नाही. शुक्रवारी ख्रिसमसची शासकीय सुट्टी, त्यानंतर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. ३०) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 

    दुसऱ्या दिवसापर्यंत अर्ज दाखल न केलेल्या ग्रामपंचायतीची नावे – जांबरे, बुक्कीहाळ, देवरवाडी, ढोलगरवाडी, धुमडेवाडी, किटवाड, कौलगे, माडवळे, म्हाळेवाडी, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, कालकुंद्री, राजगोळी बुद्रुक, मांडेदुर्ग, आसगाव, बसर्गे, बागिलगे, बोजुर्डी, घुल्लेवाडी, हलकर्णी, होसूर, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, केरवडे, किणी, मलतवाडी, मुगळी, नागवे, नांदवडे, पुंद्रा, सुरुते.No comments:

Post a Comment