खारुताईला पकडायला गेला अन्...... ढेकोळीच्या निखिलचा मित्रासह विहिरीत बुडून मृत्यू, बेकीनकेरे येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

खारुताईला पकडायला गेला अन्...... ढेकोळीच्या निखिलचा मित्रासह विहिरीत बुडून मृत्यू, बेकीनकेरे येथील घटना
कागणी : एस. एल. तारीहाळकर

          बेकीनकेरे (ता. बेळगाव) येथे खारुताईला पकडायला गेले आणि विहिरीत बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. यामध्ये ढेकोळी (ता. चंदगड) येथील निखिल रामू बोंद्रे (वय ८) तर लोकेश विठ्ठल पाटील (वय १०, रा. बेकीनकेरे) यांचा मृतात समावेश आहे. सदर घटना  मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस.

            घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निखिल हा आपल्या मामाच्या घरी गेला होता. रोजच्या प्रमाणे तीन मुले खेळत होती.  यामध्ये निखिल व लोकेश घरा शेजारी खेळत होते. निखिल याच्या पश्चात लहान भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. निखिल हा महिनाभरापूर्वी बेकीनकेरे येथे मामाच्या घरी गेला होता. गोजगा या मार्गावर घराजवळ खेळता-खेळता घराशेजारी एक पडकी विहीर आहे. या ठिकाणी खारुताईला पकडायला सर्वप्रथम निखिल पुढे गेला. त्याला वाढलेल्या गवताचा अंदाज आला नाही अन् विहिरीत पडला. त्याला वाचवायला पुढे गेलेला लोकेशही पाण्यात बुडून मृत्यू पावला. तर तिसऱ्या मुलग्याने घरी जाऊन माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. याबाबत काकती पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.No comments:

Post a Comment