चंदगड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2020

चंदगड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका

                        चंदगड तालुक्यात अवकाळी पावसाने दणका दिल्याने लोकांची तारांबळ उडाली.


चंदगड / प्रतिनिधी 
        चंदगड तालूक्यात आज रात्री आठ वाजण्याच्या सूमारास मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने तासभर झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला. 
      आज दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण होते. ऊष्म्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी पाच वाजता विजेच्या कडकडाटाला सुरवात झाली. वादळी वारा व विजेचा कडकडाटासह सुमारे दोन तास पावसाने झोडपून काढले. कानूर, चंदगड, नागनवाडी, दाटे, डुक्करवाडी, माणगाव, कोवाड, कार्वे, शिनोळी, अडकुर, तुडये  या परिसरात पावसाने हजेरी लावली. सुगीच्या अंतिम टप्प्यात पडलेला पाऊस काजू, आंबा, मका आदी पिकांना फायदेशिर ठरला आहे.No comments:

Post a Comment