दाटे ग्रामपंचायतीच्या शौचालय अनुदानात १ लाख ७२ हजारांचा अपहार - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2020

दाटे ग्रामपंचायतीच्या शौचालय अनुदानात १ लाख ७२ हजारांचा अपहार

चंदगड / प्रतिनिधी

          दाटे (ता. चंदगड) येथील ग्रूप ग्रामपंचायतीअतंर्गत समाविष्ट असलेल्या नरेवाडी येथील स्वच्छ भारत अभियान शौचालय योजनेत, ग्रामसेवक, सरपंच व १५ लाभार्थ्यानी मिळून संगनमताने बोगस शौचालय दाखवून एक लाख  ७२,६०० रुपयांचा अपहार केला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी नुसार पं. स. चे विस्तार अधिकारी एस. एम. ठोंबरे यांनी केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली असून ग्रामसेवक व्हि. डी. वसावे  व समुह समन्वयक विश्वास पारधी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

       दाटे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या नरेवाडी येथील पात्र लाभार्थ्यांना डावलून एकाच कूटूबांतील विभक्त नसलेल्या सदस्यांना ज्यांची  नावे ग्रामपंचायत घरटाण यादीत नोंद नाहीत. असा सदस्यांना शौचालय मंजूर करून अनुदान उचलही केले. याउलट ज्या लाभार्थ्याकडे शौचालय असूनही त्यांना स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे राजेंद पाटील व अन्य ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार गटविकास अधिकार्याकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी श्री. ठोंबरे यांनी तपासणी करून गटविकास अधिकारी यांचे कडे कारवाई साठी अहवाल पाठवण्यात आला आहे. बोगस शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याकरणी ग्रामसेवक व समन्वयक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.No comments:

Post a Comment