चंदगडच्या लालपरीला प्रवाशांचा प्रतिसाद उत्पन्नात वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2020

चंदगडच्या लालपरीला प्रवाशांचा प्रतिसाद उत्पन्नात वाढ

नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात महिने चंदगड आगारातून बंद असलेली बस सेवा जोमाने सूरू असून प्रवाशांनीही आता मास्क, सॅनिटायझर चा वापर करत बस मधून प्रवास करण्याला प्राधान्य दिल्याने चंदगड आगाराला दररोज सरासरी अडीच  लाखांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यानी दिली.   

 चंदगड आगारामार्फत प्ररवाशांच्या सेवेसाठी मूबई१, पूणे ४, निगडी१, सातारा१, सांगली१, कोल्हापूर२२, बेळगाव ३६ या फे-यासह तालुकातंर्गत  विविध बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे चंदगड तालुक्यातील प्रवाशांकडून एस. टी. प्रवासाला अल्प प्रतिसाद मिळत होता .मात्र मागील २०/२५दिवसापासून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.कोरोनामुळे अद्याप शाळा , कॉलेज नियमत सुरू झाले नसल्याने विद्यार्थी वर्गाचा प्रवास थांबला असल्याने मोजक्या प्रवाशांना घेऊन बस वाहतूक सुरू आहे.दरम्यान  प्रवाशांच्या घटलेल्या संख्येमुळे महामंडळाने उत्पन्नाचा पर्यायी मार्ग म्हणून दहा टनापर्यंतची माल वाहतूक ( वस्तू , साहित्य ) ३८ रुपये किलो मीटर दराने सुरू केली आहे . तसेच रिटन असल्यास ३६ रुपये दराने वाहतुकीची सोय उपलब्ध केली आहे . भविष्यात पार्सल सेवा देखील सुरू करण्याचा मानस एस टी महामंडळाचा असल्याची चर्चा आहे. सध्या चंदगड आगाराच्या विविध बस फेऱ्या सुरू आहेत.कोल्हापूर - कोदाळी बस देखील सुरू केली आहे . तर इसापूर बस सुरू करण्याची मागणी होत असली तरी येथील रस्ता खचला असल्याने बांधकाम विभागाकडून वाहतुकी संदर्भातील पत्र प्राप्त झाल्याखेरीज इसापूर बसफेरी सुरू करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

         चंदगड बेळगाव, हलकर्णी फाटा ते बेळगाव असे वडापने सूरू असून  याचा फटका चंदगड आगाराला बसत आहे. याबाबत पोलिस व आरटीओकडे तक्रार करणार असल्याचे आगार प्रमुख गौतम गाडवे यांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

डेपोने विद्यार्थ्यांना पासची सुविधा लवकर उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आहे

Post a Comment