तिलारीत बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह सापडला - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

तिलारीत बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह सापडला

 

सुशांत शेट्टी

 कागणी : प्रतिनिधी

 रविवारी दुपारी फिरावयास गेलेला बेळगावच्या तरुणाचा तिलारी धरणात बुडून मृत्यू झाला. सदर तरुणाचा मृतदेह सोमवारी दुपारी सापडला असून सुशांत शेट्टी (वय 28, महावीर गल्ली, उदमबाग बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला मात्र त्याचा मृतदेह सापडला नाही. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. बेळगाव अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांचे पथक तसेच चंदगड पोलीस निरीक्षक ए. बी. तळेकर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोवार, हवालदार अमोल पाटील, कृष्णा पाटील, आनंद देसाई यांनी परिश्रम घेतले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आला.No comments:

Post a Comment