जिल्हा परिषद शाळा समृद्ध झाल्या पाहिजे - कल्लाप्पांना भोगण, माणगाव येथे जिप शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

जिल्हा परिषद शाळा समृद्ध झाल्या पाहिजे - कल्लाप्पांना भोगण, माणगाव येथे जिप शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

माणगाव जि प मतदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना जिप सदस्य भोगत, विद्या पाटील, उपसभापती शिवणगेकर व मान्यवर.


चंदगड : सी एल वृत्तसेवा

'अ' म्हणजे अज्ञान आणि 'ज्ञ' म्हणजे ज्ञान अशी मराठीतील अ ते ज्ञ मुळाक्षरे  शिकवून अज्ञानापासून ज्ञानाकडे नेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा समृद्ध झाल्या पाहिजे. असे प्रतिपादन माणगाव मतदारसंघाचे जिप सदस्य कल्लाप्पांना भोगण यांनी केले. ते केंद्रीय प्राथमिक शाळा माणगाव येथे जिप. प्राथमिक शाळांना क्रीडा, प्रयोगशाळा साहित्य, वाटर प्युरिफायर, टॅब आदी  शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्या विद्या विलास पाटील व पंचायत समिती उपसभापती मनीषा अनिल शिवणेकर यांची उपस्थिती होती.

लोकराजा राजर्षी शाहू यांच्या प्रतिमा पूजनानंतर मुख्याध्यापक एन व्ही पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी केले. यावेळी पुढे बोलताना भोगण म्हणाले तालुक्यात ७५ महिला सरपंच आहेत. त्यांच्यासह इतर सरपंच, सदस्य किंवा नागरिक दीडशे किमी वरून कोल्हापूरला गेल्यानंतर वेळेत काम नाही झाले तर ताटकळत थांबावे लागते. प्रसंगी गाडी चुकल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हे ओळखून कोल्हापुरातील १५०० स्क्वेअर फुट मध्ये ४८ लाखांची चंदगड भवन ही इमारत तालुक्यातून विरोध असतानाही उभी केली याचा अभिमान वाटतो. अशा गरजू ५० लोकांची निवास व्यवस्था येथे होऊ शकते. 

  आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची कामे व मानधन पाहिले तर आवळा देऊन कोहळा काढल्याचा प्रकार आहे. त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल असे मानधन शासनाकडून मिळावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोना महामारी च्या काळात शहरातील व इतर मोठ्या गावातील बहुतांशी डॉक्टर भूमिगत झाले. मात्र माणगाव मधील डॉक्टरांनी जीवावर उदार होऊन कोणत्याही रुग्णाची हेळसांड होऊ दिली नाही. त्याबद्दल कोविड योध्दा म्हणून माणगाव मध्ये खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर विलास पाटील, सुभाष पाटील, राजीव पाटील, दयानंद बेनके, बाळासाहेब बेनके, पराग जोशी यांच्या सह परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा स्वयंसेविका यांना  शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास भावकू पाटील यांनी विरोधकांनी निदान विकास कामांच्या तरी आड येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी केंद्रप्रमुख डी आय पाटील, गोपाळ जगताप, कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, माणगाव तंटामुक्त अध्यक्ष आप्पा सुरुतकर, दयानंद नौकुडकर,उपसरपंच बाबू दुकळे, अध्यापिका मंगल नौकुडकर, नंदकुमार होनगेकर, ग्रामसेवक दोरुगडे, कोवाड ग्रापं सदस्य रामचंद्र व्हन्याळकर, विनायक राजगोळकर, रमेश जाधव आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सट्टूपा फडके यांनी केले.  आभार गोपाळ डुरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment