तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला साटेली आवाडा येथे मोठे भगदाड, पाणी रस्त्यावर आल्याने साटेली भेडशी तिलारी महामार्ग दोन तास बंद, वाचा सविस्तर.. - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला साटेली आवाडा येथे मोठे भगदाड, पाणी रस्त्यावर आल्याने साटेली भेडशी तिलारी महामार्ग दोन तास बंद, वाचा सविस्तर..

गोवा राज्याचा पाणी ठप्प, कार्यकारी अभियंता यांचा निष्काळजीपणा नडला उन्हाळी शेती धोक्यात 

तिलारी धरणाच्या कालव्याला पडलेले भगदाड.

दोडामार्ग / विशेष प्रतिनिधी

               महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या कालवा बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे कालवे गळती सुरू आहे.पण जलसंपदा विभाग अधिकारी नको तीथे कोट्यावधी रुपये विनाकारण खर्च करत आहेत.पण कालवा दूरूस्तीकडे डोळेझाक करत साटेली आवाडा येथे कालवा गळती सुरू आहे याची जाणीव संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देऊन देखील दूर्लक्ष केले त्यामुळे अधिकारी यांच्या निष्काळजीपणा सोमवारी साटेली भेडशी आवाडा येथे तिलारी डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडून शेती बागायती यांचे मोठे नुकसान होऊन आवाडा येथे रस्त्यावर पाणी आल्याने साटेली भेडशी तिलारी महामार्ग वाहतूक बंद पडली.दोन तास वाहने अडकून अशा प्रकारे बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली जात आहे.


           तिलारी डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने उन्हाळी शेती हंगाम सुरू असताना कलवा फुटला त्यामुळे गोवा राज्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.हा कालवा दूरूस्ती करीता दोन ते तीन महिने जाणार आहेत.तिलारी अधिकारी यांच्या निष्काळजीपणा मुळे हा कालवा फुटला आहे असा आरोप शिवसेना पदाधिकारी मिलिंद नाईक,विजय जाधव , तसेच स्थानिक शेतकरी पांडुरंग नाईक यांनी केला आहे.


                       
  * साटेली आवाडा खानयाळे रस्ता *

           येथून काही किलोमीटर अंतरावर डाव्या मुख्य कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती होती .साटेली आवाडा गावातील शेतकरी यांनी संबंधित कर्मचारी तसेच कालवा विभाग कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर यांना प्रत्यक्ष गळती दाखवली होती.पण पण पाणी कमी करुन त्या ठिकाणी मातीच्या पिशव्या भरून ताडपत्री ठेवून तात्पुरती मलमपट्टी केली होती पण दूरूस्ती केली नाही.गेल्या नोव्हेंबर मध्ये हे केले होते. दहा बारा दिवसांपूर्वी पुन्हा गळती सुरू झाली होती पण संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी याकडे डोळेझाक केली.

कालव्याचे रस्तावर आलेले पाणी. 

            सोमवारी दुपारी तीन वाजता साटेली आवाडा येथे अचानक मोठा आवाज आला त्यामुळे आजूबाजूला असलेले शेतकरी गुरे चरवणारे घटनास्थळी आले तर कालव्याला भगदाड पडून पाणी वेगाने बाहेर पडत असल्याचे दिसून आले.हा हा म्हणता कालव्याचा वरचा भाग भगदाड रूंद होऊन पावसाळ्यात जसा पूर येतो या प्रचंड वेगाने पाणी आवाडा गावात शिरले. त्यामुळे संपूर्ण शेतात नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.


              आवाडा येथे रस्त्त्यावर पाणी, दोन तास वाहतूक ठप्प

                तिलारी डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने वेगाने बाहेर पडणारे पाणी थेट आवाडा गावातील लोकांच्या शेती बागायती मधून आवाडा येथील मोरीला आले. हा हा म्हणता मोरी पाण्याखाली गेली .पावसाळा नाही मग अचानक पूर कोठून आला एवढे पाणी कोठून आले हा प्रश्र्न वाहन धारकांना पडला अखेर तिलारी डावा कालवा फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली हे लक्षात आले.

         आवाडा येथे  कालवा फूटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे दोडामार्ग तिलारी बेळगाव कोल्हापूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली अनेक खासगी वाहने एस टी बसेस तसेच दूचाकी वाहन चालक जवळपास दोन तास अडकून पडले.पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक दोन तासांनंतर सुरळीत झाली वाहून आलेल्या मातीमुळे रस्त्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.

               कालव्याच्या ठिकाणी आवाडा येथे मोठी गर्दी

            तिलारी डावा कालवा तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे भगदाड पडून  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.येथून काही किलोमीटर अंतरावर सोमवारी दुपारी तीन वाजता कालवा भगदाड पडून फुटला हे समजताच साटेली भेडशी परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ युवक शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती .जो तो आपल्या मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करत होते.तर आवाडा येथे पावसाळ्यात पुराचे पाणी बघितले होते.पण सोमवारी उन्हाळ्यात आलेले पुराचे पाणी बघण्यासाठी तोबा गर्दी केली होती.

                     कालव्यातून होणारा पाणी पुरवठा बंद केला

             तिलारी डाव्या कालव्यातून विज निर्मिती करुन तसेच धरणातील पाणी हे थेट कालव्यात सोडले जाते तर काही पाणी येळप‌ई नदी पात्रात सोडून तिलारी नदीत सोडले जाते. सोमवारी कालवा फुटल्याचे समजाताच संबंधित अधिकारी यांनी कर्मचारी यांना सूचना करुन कालव्यातील पाणी पुरवठा बंद करायला  लावला हे पाणी येळप‌ई नदीत सोडायला लावले. कालवा फुटला तेव्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होता.संबधित अधिकारी यांनी लक्ष देऊन वेळीच दूरूस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती याला कार्यकारी अभियंता जबाबदार आहेत.असा आरोप स्थानिकांनी केला.

              गोवा राज्यातील डिचोली पेडणे पाणी पुरवठा बंद

              तिलारी धरणाच्या कालव्यातून गोवा राज्यात डिचोली पेडणे गोवा या दोन तालुक्यातील अनेक गावांना चांदेल पाणी प्रकल्पाला तसेच बांदा कालवा येथे पाणी पुरवठा केला जातो पण कालव्याला भगदाड पडल्याने गोवा राज्यात होणारा पाणी पुरवठा काही महिने बंद राहाणार आहे आहे त्यामुळे या पाण्यावर उन्हाळी शेती करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.

           तिलारी जलसंपदा विभाग कालवा दूरूस्तीकडे डोळेझाक करत आहेत मात्र गरज नाही जेथे कुञा राहात नाही अशा खोल्या तसेच खचलेले रस्ते यावर केवळ आपल्या फायद्यासाठी लाखो रुपये गरज नसताना खर्च करून कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांना संबंधित अधिकारी कामे देत आहेत.या कालव्याच्या कामाला संबंधित अधिकारी जबाबदार आहेत.तेव्हा संबंधित ठेकेदार अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे हे काम कुणी केले होते यांच्यावर कारवाई करुन अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

         तिलारी धरणाच्या डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती आहे.येथे शंभर मीटर परिसरात दोन ठिकाणी भगदाड पडण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.स्थानिक शेतकरी यानी जाणीव करून दिली होती पण अधिकारी यांनी  कालवा फुटला पाहिजे यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे असा आरोप स्थानिक शेतकरी बांधव यांनी केला आहे.कालव्याचे पाणी शेतात शिरूर लोकांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे.

                     एक वर्षापूर्वी येथील गळती बाबत लक्ष वेधले 

 साटेली गावातील ग्रामस्थ यांनी लक्ष वेधले होते, भगदाड पडले होते.त्यावेळी ते लहान होते.पण या नंतर दूरूस्ती केली नाही त्यामुळे सोमवारी तीन वाजता त्याच ठिकाणी कालवा फुटला सुदैवाने यात जीवीतहानी झाली नसली तरी नुकसान मोठे झाले आहे.

              दरम्यान कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर यांच्याशी संपर्क साधला असता कालवा फुटून लोकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करायला सांगितले आहेत. शिवाय जास्त नुकसान होऊ नये यासाठी तातडीने पाणी पुरवठा बंद केला आहे. आपले वरीष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी दोडामार्ग तहसीलदार यांना आपण माहिती दिली आहे. गोवा राज्यातील पाणी पुरवठा बंद झाला तरी येथील दूरूस्ती वेळ न लावता तातडीने यांञिकी विभाग वतीने दूरूस्ती काम केले जाणार आहे. अशी माहीती कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर यांनी दिली. दोन दिवसांत शेतकरी यांच्या नुकसाने पंचनामे केले जाणार आहेत असे सांगितले.



No comments:

Post a Comment