चंदगड ग्रामीण रुग्णांलयात कोवीड प्रतिबंधक लसीला प्रारंभ, दिवसभरात ६७ जणांनी घेतली लस, वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

चंदगड ग्रामीण रुग्णांलयात कोवीड प्रतिबंधक लसीला प्रारंभ, दिवसभरात ६७ जणांनी घेतली लस, वाचा सविस्तर

चंदगड ग्रामीण रुग्णांलयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत कोवीड प्रतिबंधक लस घेताना. शेजारी 
वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. एस. साने, सभापती ॲड. अनंत कांबळे, नगराधक्षा सौ. प्राची काणेकर व  इतर.

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड ग्रामीण रुग्णांलय येथे कोवीड लस देण्याचा शुभारंभ आज करण्यात आला. सभापती ॲड. अनंत कांबळे व नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तहसिलदार विनोद रणवरे प्रमुख उपस्थित होते. 

कोवीड प्रतिबंधक लस घेताना वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. एस. साने

       सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. एस. साने यांनी कोवीडची लस घेतली. त्याचबरोबर डॉ. सचिन गायकवाड व डॉ. एस. एम. हसुरे यांनीही हि लस घेतली. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी यांना हि लस देण्यात आली. 

कोवीड प्रतिबंधक लस घेताना डॉ. सचिन गायकवाड.

       यामध्ये चंदगड व  कानुर आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी, सेविका, आशा सेविका, खासगी डॉक्टर्स अशा ६७ जणांना चंदगड ग्रामीण रुग्णांलयात आज लस देण्यात आली. यापुढील काळात अन्य कर्मचारी व खासगी डॉक्टर्स व नर्सेस यांनाही पहिल्या टप्यात हि लस दिली जाणार आहे. दररोज १०० कर्मचाऱ्यांना हि लस दिली जाईल. चंदगड तालुक्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये ११७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.  

कोवीड प्रतिबंधक लस घेताना डॉ. डॉ. एस. एम. हसुरे.

            यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. एस. एम. हसुरे,  कार्यालय अधीक्षक श्री. कलेकर, रवी पाटील, पी. टी. मेंगाणे, बी. बी. शेळके, सौ. एम. एम. नाईक, पुनम कांबळे आदी स्टाफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment