झेप बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत प्रजासत्ताकदिनी शिनोळी येथे "सन्मान कोवीड योद्ध्यांचा" - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

झेप बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत प्रजासत्ताकदिनी शिनोळी येथे "सन्मान कोवीड योद्ध्यांचा"

चंदगड / प्रतिनिधी

             मजरे कारवे (ता. चंदगड) येथील झेप बहूउद्देशिय सेवा संस्थेच्या वतीने मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ या प्रजासत्ताक दिनी सायंकाळी ४.00 वाजता शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आपल्याजीवाची पर्वा न करता आपल्या गावची राज्याची तसेच देशाची सेवा करणाऱ्या कोवीड योध्यांना सलाम म्हणुन “ सन्मान कोवीड योद्ध्यांचा ” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आम.राजेश पाटील यांच्या हस्ते परशराम पाटील याच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद पठाणे, नंदकुमार ढेरे (दैनिक लोकमत), नारायण गडकरी (दैनिक पुढारी), निवृत्ती हारकारे (दैनिक तरुण भारत), विलास कागणकर ( पुण्यनगरी), महेश बसापुरे (युवा संवाद), प्रकाश ऐनापुरे (किर्तीवंत), डॉ. सुनिल पाटील (शीतल इंडस्ट्रीज), नंदकिशोर गावडे, संतोष भोसले (चंदगड टाईम्स), तातोबा गावडा (अन्वेषन न्यूज), डॉ. बाबू प. पाटील (सावित्री हॉस्पीटल), तानाजी जगताप, विष्णू कार्वेकर, संतु कांबळे, सागर दोरूगडे, कृष्णदेव होवाळ, राजकुमार पाटील या कोवीड योध्दांच्या सत्काराबरोबरच उद्योजक उदय शंकरराव घोरपडे यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

        यावेळी पूणे येथील मानिनी फौडेशनच्या डॉ. भारती चव्हाण या महिला उद्योग या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला सभापती अँड अनंत कांबळे, उपसभापती सौ. मनिषा शिवणगेकर, पो. नि. बी. ए. तळेकर, सरपंच माधुरी सावंत भोसले, जि. प. सदस्य अरूण सुतार, शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, तुकाराम गो. पाटील, पं. स. सदस्या सौ. रूपा खांडेकर, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बाळासाहेब पाटील (लौकीक ट्रेडर्स), नितीन पाटील (सरपंच, शि. बु.), अमृत जत्ती (कॉर्टेक्टर), मोनाप्पा पाटील (उदयोजक), रजत हुलजी (निर्माण कंस्ट्रकशन), सौ. शितल रामकृष्ण पाटील (उदयोजक), शंकर पाटील (उदयोजक), वैजनाथ दरेकर   (गोल्डन कॅश्यू), आकाश घोरपडे (लक्ष्मी मॅन्युफॅक्चर), मछिंद्र भोसले (सिध्दीविनायक), राजू पाटील (दिपांजली इंडस्ट्रीज), प्रल्हाद जोशी (श्रीराम स्टील), मनोज सावंत (नागनाथ प्रेस), उमेश सुर्यवंशी (सुर्यवंशी ट्रेडर्स),  भाऊराव गडकरी (शीतल इंडस्ट्रीज), महेश करटे (आरोही इंटरप्राजेस), सौ. चंद्रकला वि. बामूचे (माजी अध्यक्षा  बाजार समिती)आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

          यावेळी झेप संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सुत्रसंचालन  प्रा. मायाप्पा पाटील करणार आहेत.   राजकुमार पाटील तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment