तिलारी धरणात बुडून तरूणाचा मृत्यू , कुटुंबीय व मित्रासह गेला होता पर्यटनासाठी, कधी घडली ही घटना, कोण आहे हा तरुण? - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

तिलारी धरणात बुडून तरूणाचा मृत्यू , कुटुंबीय व मित्रासह गेला होता पर्यटनासाठी, कधी घडली ही घटना, कोण आहे हा तरुण?


कागनी : प्रतिनिधी

  महावीर गल्ली, उद्यमबाग बेळगाव येथील सुशांत शेट्टी (वय 28) या तरूणाचा हजगोळी (ता. चंदगड) जवळ तिलारी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी चंदगड पोलिस स्थानकाचे पोलीस जमीर मकानदार, अमोल पाटील व बेळगाव अग्निशामक दलाचे व्ही. एस. टक्केकर यांनी भेट दिली. 

सदर तरुण कुटुंबीय व मित्रासह फिरायला गेले होते रविवारी दुपारपर्यंत फिरले. त्यानंतर सदर तरुण आंघोळीसाठी पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. एकूण 16 जन ते गेले होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली मात्र त्याचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.



No comments:

Post a Comment