बिबट्याच्या वावरामुळे नागरीकांनी सावधानता बाळगावी - वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचे आवाहन, तालुक्यातील कोणत्या परिसरात बिबट्याचा वावर? वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

बिबट्याच्या वावरामुळे नागरीकांनी सावधानता बाळगावी - वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचे आवाहन, तालुक्यातील कोणत्या परिसरात बिबट्याचा वावर? वाचा सविस्तर

शिनोळी परिसरात सापडलेले बिबट्याच्या पावलांचे ठसे.

चंदगड / प्रतिनिधी

              शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) गावानजीक शिनोळी ते तुडये मार्गावरील मारुती गावडे यांच्या कोबी भाजी मळ्यातून बिबट्या गेल्याचे चित्रण  मंगळवार १२ जानेवारी रोजी मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या आकाश घोरपडे यांनी केले होते. याची खातरजमा करण्यासाठी पाटणे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील आपल्या स्टाफसह लागलीच दाखल झाले. 

बिबट्याच्या पायांचे ठसे सापडलेल्या जागेची पाहणी करताना वनवभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ.


          यावेळी शेतकरी मारुती गावडे, आकाश घोरपडे, डॉ. सुनील पाटील आदींनी बिबट्याचा वावर असलेले क्षेत्र फिरवून दाखवले. या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे व विष्टा आढळून आली. त्यामुळे येथे बिबट्याचा वावर अधोरेखित झाला आहे. परिसरात शेतकरी, महिला, ऊस तोड कामगार, मेंढपाळ यांनी सावधानता बाळगावी. रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवावी, एकटे शेतात जाऊ नये, तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

यावेळी जि. प. सदस्य अरुण सुतार, शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच रघुनाथ गुडेकर, तालुका संघ संचालक परशराम पाटील उपस्थित होते. आमदार राजेश पाटील यांनी हि वन विभागाला सुचना केल्या आहेत. यावेळी वनपाल नेताजी धामणकर, बी. आर. भांडकोळी, वनरक्षक एम. आय. सनदी, एस. बी. तांबेकर, डी. एम. बडे, वनकर्मचारी विश्वनाथ नार्वेकर यांचा पथकात समावेश होता. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रावर वनविभाग लक्ष ठेवून असला तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे. 



No comments:

Post a Comment