वाघोत्रे येथे तीन लाख तीस हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त, तूडये येथील यूवकाला अटक - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

वाघोत्रे येथे तीन लाख तीस हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त, तूडये येथील यूवकाला अटक

 


चंदगड /प्रतिनिधी :-- पारगड -वाघोत्रे दरम्यान गोवा बनावटीची दारू वहातूक करण्या-या यूवकाला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने  कारवाई करून तीन लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला असून उमेश गोविंद आवडण (रा. तुडये) या यूवकाला अटक करण्यात आली आहे

    चंदगड तालुक्यातील पारगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेल्या चोरट्या मार्गाने काही व्यक्ती अवैधरित्या गोवा राज्यात तयार झालेल्या व महाराष्ट्र राज्यात परवानगी नसलेले विदेशी मद्याची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार रविवारी  (24 जानेवारी 2021)रोजी रात्री भरारी पथकाने सापळा रचला  त्यानुसार मंगळवार दि 25 जानेवारी 2021 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास  पारगडकडून येत असलेल्या एका मारुती अल्टो (कार क्रं MHO6 W3006) या कारची  तपासणी वाघोत्रे येथे थांबून केली असता  सदर वाहनांमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्य भरलेले विविध ब्रॅडचे 750 व 180 मिली क्षमतेचे एकूण 33 बॉक्स मिळून आले. यावेळी या वाहनात उमेश गोविंद आवडण (रा. तुडये) हा यूवक मिळून आला. असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. बाजारभावाप्रमाणे या दारूची 1 लाख 75 हजार 200/-इतकी किंमत असून  वाहनासह एकूण जप्त मुद्दे मालाची किंमत 3 लाख 30 हजार 200/- रुपये इतकी आ

कोल्हापूर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक वाय.एम.पवार, उपअधिक्षक बापु चौगुले व संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बग्ग, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील , जवान मारुती पवार, सचिन काळेल, संदीप जानकर, सागर शिंदे व जय शिनगारे यांनी सहभाग घेतला. दुय्यम निरीक्षक किशोर नडे हे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment