बसर्गे येथे शाॅर्टसर्कीटने दहा ट्राॅली गवत जळून खाक - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

बसर्गे येथे शाॅर्टसर्कीटने दहा ट्राॅली गवत जळून खाक

 


चंदगड/प्रतिनिधी

बसर्गे (ता. चंदगड) येथील शेतकरी दशरथ आप्पाजी पाटील यांचे राहत्या घराच्या समोर रचलेल्या गवत गंजीला आग लागून दहा ट्राॅली गवत जळून खाक झाले. हि आग विद्युत खांबावरील शॉर्टसर्किट मुळे ही आग लागली आहे. खांबावरून लोंबकळणा-या विद्युत वाहिन्या काढुन घेण्याबाबत या शेतकर्याने दोन वर्षांपासून विजवितरण कंपनीला अर्ज दिलेले आहेत, पण अधिका-यानी दूर्लक्ष केल्यामुळेच आजची आगीची घटना घडली आहे. दुपारी १२वाजता उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने तासाभरात गवत गंज्या जळून खाक झाल्या.दूपारची वेळ असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली.अन्यथा आगीच्या तडाख्यात इतकी भीषण होती की समोरील घर सुद्धा जळून खाक झाली असती.घरासमोरील असलेला हा विद्युत खांब धोकादायक होता .. म्हणून गेल्या दोन वर्षापासून वारंवार एमएसईबी ला लेखी अर्ज करून सुद्धा एमएसईबी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आज झालेल्या घटनेमुळे या शेतकर्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे . दुग्ध व्यवसाय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्याकडून होत आहे.



No comments:

Post a Comment