न्हावेली येथे गावातून दिंडी काढून राममंदिर बांधकामासाठी निधी संकलन - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

न्हावेली येथे गावातून दिंडी काढून राममंदिर बांधकामासाठी निधी संकलन

न्हावेली (ता. चंदगड) येथे राम मंदिर बांधकामासाठी निधी संकलन दिंडीत सहभागी झालेले ग्रामस्थ.

चंदगड / प्रतिनिधी

        मौजे न्हावेली (ता. चंदगड) येथे राममंदिर निधी संकलन अभियान राबविण्यात आले. यानिमित्त संपुर्ण गावातून ग्रामस्थांनी दुपारी दोननंतर दिंडी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी `श्री राम जयराम` चा घोष न्हावेलीत दुमदुमत होता.

            गावातील जेष्ठ मंडळी, महिला मंडळ आणि राजमुद्रा सांस्कृतिक मंडळ तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला होता. राम मंदिर बांधकामसाठी निधी संकलनाचे काम चंदगड तालुक्यात सुरु आहे. मंदिर बांधकामासाठी तालुक्याच्या अन्य गावातही निधी संकलनाचे काम सुरु असून ग्रामस्थांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समजते. 
No comments:

Post a Comment