'संत गजानन' हॉस्पिटलचा उत्कुष्ट कार्याबद्दल गौरव, लोकाभिमुख प्रमुख दहा हॉस्पिटल मध्ये स्थान - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

'संत गजानन' हॉस्पिटलचा उत्कुष्ट कार्याबद्दल गौरव, लोकाभिमुख प्रमुख दहा हॉस्पिटल मध्ये स्थान

महागाव / प्रतिनिधी

      महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य  योजनेतील उत्कुष्ट कार्य व लोकाभिमुख सेवेत प्रमुख  दहा हॉस्पिटल मध्ये स्थान  मिळवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने  जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी डॉ. यशवंत चव्हाण याचां प्रमानपत्र देऊन विशेष गौरव केला. प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर येथे हा कार्यक्रम झाला.
    संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यानी ग्रामीण भागातील रुग्नासाठी 1997 मध्ये हॉस्पिटलची स्थापना केली. अल्पदरातील अत्याधुनिक सुविधा व रुग्नसेवेतील तत्परता यामुळे अल्पावधितच हे रुग्नालय गोरगरिबासाठी जिवनदायीनी ठरली आहे. यापुर्वी या हॉस्पिटलला उत्कुष्ट कार्याबद्दल आयुषमान भारतचा स्कोच, सकाळ एक्सलन्स पुरस्कार व एनएबीएच मानाकंन मिळाला आहे.
      याकामी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. रुपाली कोरी यासह तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत असून संस्थाध्यक्ष ॲडआण्णासाहेब चव्हाण सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण याच्यां मार्गदर्शनाखाली हाँस्पिटलची यशस्वी वाटचाल सुरु आहे.


No comments:

Post a Comment