तुर्केवाडीतील सोपानदेव पुण्यतिथी उत्सवास बुधवारपासून प्रारंभ,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2021

तुर्केवाडीतील सोपानदेव पुण्यतिथी उत्सवास बुधवारपासून प्रारंभ,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी


कार्वे/ प्रतिनिधी

तुर्केवाडी येथील ग्रामदैवत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव बुधवार दिनांक 6 जानेवारी 2019 पासून मंगळवार दिनांक 12 जानेवारी अखेर होणार आहे. या 99 व्या पुण्यतिथी उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 6 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता दीपप्रज्वलनाने या उत्सवाची सुरुवात होणार आहे.

दररोज सकाळी चार ते सहा या वेळेत काकड आरती होणार आहे. सकाळी सात ते अकरा पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, अकरा ते दोन महिला भजनी मंडळ यांचे भजन, दुपारी दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी चार ते सहा हरिपाठ, सायंकाळी साडेसहा ते साडेसात प्रवचन, रात्री आठ ते दहा किर्तन व त्यानंतर रात्रभर भजनाने जागर करण्यात येणार आहे.

          बुधवार 6 जानेवारी रोजी ह-भ-प कृष्णा गावडे यांचे प्रवचन व ह.भ.प. दत्तू वाईंगडे गुडेवाडी यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार 7 रोजी ह-भ-प तुकाराम कांबळे यांचे प्रवचन तर ह भ प नारायण एकल महाराज जोगेवाडी यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार 8 जानेवारी रोजी हभप बाळू भक्तीकर यांचे प्रवचन व ह.भ.प. पूर्णानंद काजवे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार 9 जानेवारी रोजी हभप यल्लाप्पा पाटील सांगाव यांचे प्रवचन व ह-भ-प उद्धव जांभळे महाराज निढोरी यांचे कीर्तन होणार आहे. रविवार 10 जानेवारी रोजी हभप एम पी पाटील कावणेकर यांचे प्रवचन व ह.भ.प. सुभाष शिंगे नागाव यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार 11 जानेवारी रोजी ह.भ.प. डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व ह.भ.प. शंकरराव मोरे महाराज शेलारवाडी यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार 12 जानेवारी रोजी सकाळी सात ते नऊ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता करण्यात येणार आहे व ह.भ.प. परशराम कणगुटकर महाराज सोनोली यांचे सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान काला कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी अकरा वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजता दिंडी व मंगलकलश मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता होणार आहे. रविवार सकाळी दहा वाजता सोपानदेव पुष्पवृष्टी आयोजित करण्यात आली आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर संयोजकांनी उपस्थित सर्व भक्तांना मास्क वापरणे व सँनीटायझर वापरणे बंधनकारक असल्याचे व शासनाचे नियम सर्वांनी पाळून हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. तरी पंचक्रोशीतील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहेत.No comments:

Post a Comment