लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्या विचाराचा वारसा जपूया - आर. जी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2021

लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्या विचाराचा वारसा जपूया - आर. जी. पाटील

 कालकूंद्री येथे तुकाराम पवार यांची ९७ वी जयंती साजरी

लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी कामगार आयुक्त आर. जी. पाटील 

चंदगड / प्रतिनिधी

      लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपण जपला तरच पुढच्या पिढीला याची जाणीव होईल आणि शैक्षणिक चळवळीला उभारी मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार आयुक्त आर जी पाटील यांनी केले . ते कालकूंद्री ता.चंदगड येथील सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार जुनियर कॉलेजमध्ये लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अँड. एस. आर. पाटील होते. प्रस्ताविक प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांनी केले.  

      श्री.पाटील पूढे म्हणाले, ``प्रतिकूल परिस्थितीत खेडूत शिक्षण मंडळाने जर तत्कालीन परस्थितीत श्री सरस्वती विद्यालय सुरू केले नसते तर आपण या पदापर्यंत पोहोचलो नसतो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून आपण शाळेसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करू असे विचार कोल्हापूरचे उद्योगपती शिवाजी मुरकुटे यांनी व्यक्त केले. 

   यावेळी उद्योगपती मुरकुटे यांनी बेंटली फाउंडेशन मार्फत विद्यालयाला 70 बेंच भेट स्वरूपात प्रदान केले. यावेळी विद्यालयाकडून आर जी पाटील व उद्योगपती मूरकूटे यांचा सत्कार अॅड. एस आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . प्रा.एन.एस. पाटील यांनी संस्थेचा इतिहास कथन केला.यावेळी अॅड एस.आर.पाटील, सचिव प्रा.आर पी पाटील, डॉ. ए.एस जांभळे, जी एस पाटील , डॉ. राहुल पवार डॉ.पी.आर. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .त्याचे उद्घाटन श्रीमती बायाक्का तुकाराम पवार यांच्या हस्ते पार पडले .या स्पर्धेत ४४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता . लोकनेते तुकाराम पवार यांची रांगोळी रेखाटन करणारा कलाकार मारुती आंबेवाडकर याचे विशेष कौतुक करण्यात आले.यावेळी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी सहसचिव एल.डी. कांबळे, एम.एम.तुपारे ,मनोहर पवार, वसंत पवार,दिलीप पवार ,डॉ. राहुल पवार , एम.बी. पाटील, रा.ना .पाटील,आर.एम. फर्नांडिस, एन.के. पाटील, आर.आर. देसाई, एन.आर. पाटील,आर.बी. मुतकेकर, एम.एम. जमादार, आर.एम. कोले, पी.टी.वडर, सी.बी. निर्मळकर, एस.व्ही. गुरबे,शामराव मुरकुटे ,गजानन पाटील, रामराव पाटील, विविध शाळांचे मुख्याध्यापक ,शालेय समिती सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. पाहूण्यांची ओळख एस.एल.बेळगांवकर यांनी करून दिली.सूत्रसंचालन ई एल पाटील .यांनी केले तर आभार प्राध्यापक ए. आर. गुरव यांनी मानले.




No comments:

Post a Comment