न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर यावर चंदगड येथे चर्चासत्र संपन्न, काय झाली चर्चा? - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2021

न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर यावर चंदगड येथे चर्चासत्र संपन्न, काय झाली चर्चा?

चंदगड न्यायालयात आयोजित चर्चासत्रात सहभागी झालेले दिवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार, सहदिवाणी न्यायाधीश डी.एम. गायकवाड, सरकारी अभियोक्ता एस.व्ही. भादूले, प्रा. एम. एम. आमणगी, संजय साबळे, संपत पाटील

सी. एल. वृत्तसेवा / चंदगड

          न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर याबाबत चंदगड  दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे  विधी सेवा समितीच्या वतीने  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमीत्ताने न्यायालयीन कामकाजातील मराठी भाषेचा प्रभावी वापर या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

          भाषा हे विचारांचे आदानप्रदान करण्याचे माध्यम आहे. आणि मातृभाषा हे त्याचे सुलभ साधन आहे. न्यायालयीन कामकाज इंग्रजी भाषेतच चालते हा सामान्य लोकांचा समज आहे. न्यायालयीन कामकाज हे मराठी भाषेतून चालते म्हणून ती न्यायालयीन भाषा म्हणून वापरणे व्यवहार्य ठरू शकते . तसेच मराठी भाषा ही न्यायालयाची भाषा म्हणून वापरताना इंग्रजी शब्दांना प्रभावीपणे पर्याय ठरतील अशा स्वरूपाचा शब्दकोश उपलब्ध आहे .न्यायालयात येणारा पक्षकार आपल्या प्रकरणाचे कामकाज मराठीतच व्हावे यासाठी आग्रह धरू शकतो . न्यायालीन कामकाजाबाबत मराठी भाषा सक्षम पर्याय ठरू शकेल. असे मत  दिवाणी न्यायाधीश ए.सी.बिराजदार यानी             चंदगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे  विधी सेवा समितीच्या वतीने  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या औचित्याने न्यायालयीन कामकाजातील मराठी भाषेचा प्रभावी वापर या विषयावर बोलताना व्यक्त केले. यावेळी  सहदिवाणी न्यायाधीश डी.एम. गायकवाड, सरकारी अभियोक्ता एस. व्ही. भादूले, प्रा. एम. एम. आमणगी, संजय साबळे, संपत पाटील यांनी सहभाग घेतला.




No comments:

Post a Comment