अंध अपंगांचा विविध मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, काय आहेत मागण्या? - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2021

अंध अपंगांचा विविध मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, काय आहेत मागण्या?

अपंग बांधव आपल्या विविध मागण्यासाठी तहसिल समोर आंदोलन करत असताना. 

चंदगड / प्रतिनिधी

      महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेस पात्र असलेल्या अंध, अपंग, अनाथ, विधवा, परितक्त्या  इत्यादी घटकांना चंदगड तालुक्यात अजूनही प्रशासन न्याय मिळत नाही. त्याला जबाबदार चंदगडच्या स्थानिक प्रशासन आहे .यासाठी आपल्या विविध मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयावर आज अंध, अनाथ यांनी धडक मोर्चा काढला. 

         पेन्शन वेळेवर मिळत नाही ,पेन्सन देताना बँकेकडून तिरस्काराची वागणूक मिळते ,एकाच कुटुंबातल्या अनेक दुर्बल असतील तर त्यांना प्रत्येक स्वतंत्र पैसे मिळावे. वाढीव पेन्शन दहा हजार रुपये मिळावी .जुनी उत्पन्न अट  रद्द करून ती रक्कम एक लाख वार्षिक करावी. प्रत्येकाला अंत्योदय योजनेतील 25 किलो तांदूळ 15 किलो गहू मिळावेत. रेशन धान्य दुकानात साखर तेल अंघोळीचा साबण कपडे धुण्याचा साबण मोफत मिळवा .आरोग्यसेवा प्रत्येकाला निवास्थानी व्हावी.मोफत घरकुल योजनेचा लाभ मिळावा या आणि अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विशेष साहाय्य योजनेस पात्र असलेल्या अंध ,अपंग, अनाथ ,विधवा ,परितक्त्या, निराधार इत्यादी दुर्बल घटकांनी आज चंदगड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काडून आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.आजपर्यंत अनेक वेळा न्याय मिळवण्यासाठी अर्ज निवेदने विनंती धरणे आंदोलने उपोषणे केली परंतु शासनाकडून या मागण्याना म्हणावा तसा न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा कडून तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन देण्यात आले .या मोर्चाचे नेतृत्व चंदगड तालुका संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल , सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे ,जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, संघटनेचे संस्थापक संजय जाधव, संपर्कप्रमुख अजित कदम, रूपाली नांगरे यांच्यासह राजश्री शाहू महाराज दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त अपंग बांधव या धडक मोर्चात सहभागी झाले होते.



No comments:

Post a Comment