किटवाडच्या अनाथ कुणालला जयप्रकाश विद्यालयाने घेतले दत्तक! वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2021

किटवाडच्या अनाथ कुणालला जयप्रकाश विद्यालयाने घेतले दत्तक! वाचा काय आहे कारण?

 

जयप्रकाश विद्यालय किणी येथे अनाथ कुणाल व गरीब विद्यार्थी अनिल कांबळे यांना शिक्षणासाठी शुभेच्छा देताना एम टी कांबळे व श्रीकांत पाटील सोबत मुख्याध्यापक मोहनगेकर, शिक्षक व कर्मचारी वर्ग.

कालकुंद्री / प्रतिनिधी
       किटवाड (ता. चंदगड) येथील अनाथ कुणाल किसन बिरजे इयत्ता आठवी याला दहावीपर्यंत निवासासह संपूर्ण शिक्षणासाठी किणी ता. चंदगड येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित जयप्रकाश विद्यालयाने दत्तक घेतले. त्याचे अपंग वडील व मूकबधिर आई दोघांचेही निधन झाल्यामुळे तो व त्याची बहीण कोमल निराधार झाले आहेत. नुकताच तो या विद्यालयात दाखल होऊन नियमित शिक्षण घेत आहे.
          चंदगड पंस चे शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी प्रशालेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत गाडगे महाराज, एन डी पाटील आदींनी गरिब निराधार मुले शिक्षण प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले त्याचा वारसा ही संस्था व विद्यालय पुढे चालवत आहे. असून येथे शिकून मोठे झालेले विद्यार्थी व समाज हे ऋण कधीही विसरणार नाही असे गौरवोद्गार काढले. त्यांच्यासोबत कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील व माजी गटसमन्वयक आप्पाराव पाटील उपस्थित होते. विद्यालया मार्फत विनामूल्य चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळेत दुर्गम कुंभवडे ता. दोडामार्ग येथील अनिल अर्जुन कांबळे या गरीब विद्यार्थ्यांलाही खेळाडू प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला आहे.
        विद्यालयाचे मुख्याध्यापक व सुप्रसिद्ध क्रीडा मार्गदर्शक पी.जे. मोहनगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कुणाल चे दहावीपर्यंतच नव्हे तर उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी संस्थाध्यक्ष मनमाडकर यांनी स्वीकारली असल्याचे नमूद केले. यावेळी अध्यापक श्रीमती एम पी कांबळे, डी एस बिर्जे, पी व्ही सुतार, व्ही एम बारड यांच्यासह एस के पाटील, पी एन तरवाळ, ए जे कुंभार, पी एस कुंभार, सौ मनीषा मनवाडकर आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment