गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासक मंडळाच्या अनोख्या निर्णयामुळे उधळपट्टी थांबवणार! - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासक मंडळाच्या अनोख्या निर्णयामुळे उधळपट्टी थांबवणार!

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती

गडहिंग्लज / प्रतिनिधी  

            गडहिंग्लज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासक मंडळाने उधळपट्टीला लगाम लावला आहे. आधीच तोट्यात असलेल्या समितीला सावरण्यासाठी हे धोरण स्विकारले असून संचालक मंडळाच्या बैठकीला नाष्टा, जेवणाला फाटा देत स्वताच्या खिशातून चहा पिण्याचा पायंडा सुरू केला आहे. तर गेल्या चौदा महिन्यापासुन प्रतीक्षेत असणाऱ्या समितीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन देऊन दिलासा दिला आहे. वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आता भविष्यात बाजार समिती तोट्यातून बाहेर पडेल अशी आशा आहे.

       गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती ही उपविभागासह सीमाभागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याचा अभय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अशासकिय 21 सदस्यांच्या प्रशासक मंडळाने पदभार स्विकारला असून गडहिंग्लज, आजरा, चंडगड आणि कागल तालुक्‍यातील 37 गावांचे समितीचे कार्यक्षेत्र आहे. पीक पध्दतीच्या बदलामुळे सर्वच शेती उत्पादनांची आवक घटली आहे. परिणामी, अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी बाजार समिती तोट्यात सापडली आहे. तोट्याच्या दृष्टचक्रातून बाहेर काढणे हेच त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. 

           सध्याच्या प्रशासक मंडळात सहकार, शिक्षण, शेती, व्यापार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळेच नाजूक परिस्थिती पाहता या सर्वांनीच काटकसरीच्या कामाकाजासाठी प्रशासनाला सुनावले. महिन्याला सुमारे 10 ते 20 हजार रुपये चहा, नाष्ठ्यासाठी खर्च व्हायचे. काही माजी संचालक आपल्या मित्रमंडळीसह येऊन समितीला आर्थिक भुर्दंडाच्या खाईत लोटत होते. नव्या प्रशासक मंडळाने या सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.यामुळे बाजार समिती तोट्यातून बाहेर पडेल यात शंका नाही.No comments:

Post a Comment