चंदगडला आई-आबा फौंडेशनच्या वतीने कोरोना योंद्धाचा सत्कार, आमदार, माजी राज्यमंत्र्याची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

चंदगडला आई-आबा फौंडेशनच्या वतीने कोरोना योंद्धाचा सत्कार, आमदार, माजी राज्यमंत्र्याची उपस्थिती

चेअरमन, पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील.

चंदगड / प्रतिनिधी

         पंचायत समितीचे सदस्य चंदगड अर्बनचे अध्यक्ष, समाजप्रिय व्यक्तीमत्व दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगडच्या आई-आबा फौंडेशनमार्फत कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन सेवा देणा-या समाजातील व्यक्तींचा सन्मान आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते मानपत्र आणि चांदीची मुद्रा देऊन करण्यात आला.  

चेअरमन, पं. स. सदस्य व उद्योजक दयानंद काणेकर

        प्रारंभी  स्वागत नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे सांगितले. स्वतासह  कुटुंबातील १४ जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे रुग्णसेवा केली. त्या घटनेने भारावून आपण आई - आबा ट्रस्टची स्थापना केल्याचे दयानंद काणेकर यांनी सांगितले. 

आमदार राजेश पाटील शुभेच्छा देताना.

         आमदार राजेश पाटील यांनी आई - आबा ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम काणेकर कुटुंबियानी चालवले असून नगरपंचायतीसाठी आपणअजित पवारांकडे पाठपुरावा करून मिळविलेल्या ५ कोटी ६५ लाखांच्या विकास निधीचेही समसमान वाटप करून निस्वार्थीवृत्ती जपण्याचे दुर्मिळ काम त्यांनी केल्याचे सांगितले. 

चेअरमन, पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दाचा सत्कार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते स्विकारताना तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. के. खोत, शेजारी तहसीलदार विनोद रणवरे , नगराध्यक्षा प्राची काणेकर, दयानंद काणेकर, सभापती अॅड. अनंत कांबळे व मान्यवर.

         माजी मंत्री भरमू पाटील यांनी सामाजिक जाणिवेतून आदर्श कार्यक्रम घेऊन माता-पित्यांचे ऋण दयानंद काणेकरांनी फेडल्याचे सांगून गटातटाच्या भिंती पलिकडेही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

                                  हे ही पहा- दयानंद काणेकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम

        सभापती अॅड. अनंत कांबळे यांनी दयानंद काणेकर यांच्या दानशूरपणाचे कौतुक करतानाच पं स च्या मासिक सभेत ते अन्यायाविरूध्द पोटतिडकीने प्रश्न मांडून आपल्या पदाला न्याय देत असल्याचे सांगितले. 

        कोरोना काळात रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, आरोग्य कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, पत्रकार आदींचा मानपत्र देऊन गौरव केला. व्यासपीठावर जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, नगरसेवक दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडूकर, अरूण पिळणकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, अनिल दळवी, शिवानंद हुंबरवाडी, शहाबुद्दीन नाईक, अल्लीसो मुल्ला, सुधीर देशपांडे, माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, राजेंद्र परिट, चंदगड अर्बनचे उपाध्यक्ष बाबुराव हळदणकर उपस्थित होते. सुत्रसंचालन एम. टी. कांबळे तर आभार संजय चंदगडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment