हलकर्णी महाविद्यालयाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

हलकर्णी महाविद्यालयाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

        हलकर्णी (ता.  चंदगड) येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त खुल्या काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.             स्पर्धेसाठी कवींनी आपली एकच स्वरचित कविता पाठवावी. कवितेला विषयाने बंधन नाही.  कविता स्वरचित असल्याचे नमूद करावे. प्रथम तीन क्रमांकांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट दिली जाईल. इच्छुक कवींनी आपल्या कविता प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या पत्यावर पाठवाव्यात. दि. ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कवींनी कविता पाठवावी असे आवाहन प्राचार्य डॉ. अनिल गवळी आणि समन्वयक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी कळविले आहे.
No comments:

Post a Comment