अथर्व-दौलतच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ, गळीत हंगामात ऊस तोडणी कार्यक्रमात येणार सुसूत्रता – चेअरमन मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

अथर्व-दौलतच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ, गळीत हंगामात ऊस तोडणी कार्यक्रमात येणार सुसूत्रता – चेअरमन मानसिंग खोराटे

अथर्व-दौलतच्या मोबाईल ॲपच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष मानसिंग खोराटे, पृथ्वीराज खोराटे व इतर कर्मचारी. 

चंदगड / प्रतिनिधी

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना कार्यस्थळावर आज अथर्व-दौलतच्या मोबाईल ॲपचा आज शुभारंभ अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांच्या हस्ते करण्यात आला. 

मोबाईल ॲपचा शुभारंभ करताना अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खोराटे 

     या ॲपमुळे गळीत हंगामात ऊस तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता येणार, ऊस उत्पादक व वाहन मालक यांना टनेजची माहीती मोबाईल मॅसेजद्वारे त्वरीत मिळविण्यासाठी तसेच नोंदणी अचूक वेळेत करणे शक्य होणार आहे. 

मोबाईल ॲपच्या शुभारंभ प्रसंगी दिपप्रज्वलन करताना पृथ्वीराज खोराटे

           यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले, ``आज अखेर ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेले आहेत. १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले या आठवड्यात अखेर जमा करत आहोत. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या अथर्व दौलत कारखान्याचे गाळप पुर्ण क्षमतेने सुरू असून मागील वर्षी प्रमाणे वेळेत ऊस बिले अदा केली आहेत. आजअखेर झालेल्या ३ लाख गाळपापैकी २ लाख ५० हजार मे. टन चंदगड तालुक्यातील ऊस आहे.``               वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या क्षेत्राला प्राधान्याने तोडणीचे नियोजन केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ``चंदगड तालुक्यातील संपूर्ण ऊस संपेपर्यंत कारखाना चालू राहील. यावर्षी उत्पादित झालेल्या कंपोस्ट खताची विक्री कारखाना कार्यस्थळावर सुरू आहे. याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा व पिकवलेला सर्व ऊस अथर्व कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन दौलत अथर्व जवळचे चेअरमन मानसिंगराव खराटे यांनी केले आहे.`` या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:

Post a Comment