![]() |
यशवंत मोरे |
चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत असलेले जवान यशवंत विठ्ठल मोरे यांना सैन्यात ऑर्डिनरी लेफ्टनंन्ट पदी बढती मिळाली आहे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना मिळालेल्या बढतीमुळे तुर्केवाडी गावासह तालुक्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या संयमी आणि देशसेवेबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
यशवंत विठ्ठल मोरे हे १९९२ ला बॉम्बे इंजिनिअरींग मिलीटरी सर्व्हिसेसमध्ये शिपाई पदावर रुजू झाले होते. तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी २६ वर्षाची सेवा बजाबली असून शिपाई पदावरून अधिकारी ऑर्डिनरी लेफ्टनंन्ट पदापर्यंत त्यांची बढती झाली आहे. सुरवातीला शिपाई पदावरून लान्स नायक, नायक, हवालदार, नायक सुभेदार, सुभेदार आणि आता ऑर्डिनरी लेफ्टनंन्ट पदी बढती मिळाली आहे. याबाबत आज प्रजासत्ताकदिनी त्यांना ही बढती देण्यात आली आहे. या बढतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment